नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका व शहराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून येत्या 29 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा शाळेत निवड समितीच्यावतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
या निवड समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, भरत गावित, रतनदादा पाडवी, अली मोहम्म़द मक्राणी, निखिलभाई तुरखिया, सुरेंद्र कुवर व माधवमामा चौधरी यांचा समावेश असून या निवड समितीचे सदस्य जिल्हा कार्यकारिणी,तालुका व शहराध्यक्षांची निवड करतील.त्यामुळे इच्छूकांनी रविवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील सेंट मदर टेरेसा शाळेत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी केले आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त़ करण्यात आली होती. पक्ष बांधण्यासाठी नव्या व कार्यक्षम कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात येणार आहे.,असेही ते म्हणाले.