नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रत्येक वर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षात जिल्हास्तरावरील कार्यक्रम 23 डिसेंबर व 24 डिसेंबर 2024 रोजी शहादा तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने सर्व कंपन्याचे विक्री अधिकारी 23 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधील शहादा तहसिल कार्यालय येथे उपस्थित राहणार असून ज्या ग्राहकांच्या समस्या असतील त्यांनी एचपीसी कंपनीचे विक्री अधिकारी गोपाल घोडमोडे भ्रमणध्वनी क्रमांक 8806399469 व ई-मेल Gopal.ghadmode3@hpcl.in, आयओसी कंपनीचे विरेंद्र अहिरराव भ्रमणध्वनी क्रमांक 7896234017/ ई-मेल ahirwarv@indianoil.in , बीपीसी कंपनीचे हितांशू स्वान भ्रमणध्वनी क्रमांक 7351002996 / ई-मेल himanshuswan@bharatpetroleum.in यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.