नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
26/ 11 ला मुंबई येथे झालेला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम नेहरू पुतळा परिसरात घेण्यात आला.
सदरील कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, शहर पोलीस स्टेशनचे पीआय भाबड , उपनगर पोलीस स्टेशनचे पीआय अमित कुमार मनेळ, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे , नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पीआय विवेक पाटील यांच्या हस्ते 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष झालेत म्हणून मान्यवरांच्या हस्ते 16 दीप प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नंदुरबार जिल्ह्याचे सल्लागार विजय पवार यांनी केले यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्ष्या श्रीमती मंगला गायकवाड, नंदुरबार जिल्हा पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष दीपक चौधरी , सचिव रुपेश देवरे,शहराध्यक्ष मनीष चौधरी ,संपर्कप्रमुख हरीश वाडीले ,सदस्य मोहीन शेख, सामाजिक कार्यकर्ते चेतन वळवी, समीर मिर्झा, पोलीस बॉईज संघटनेचे सदस्य, तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी संघटना चे पदाधिकारी, युवा चौधरी व पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.