नंदुरबार l प्रतिनिधी-
मुंबईतील सागर बंगल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी सत्कार केला.
महाराष्ट्रात त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपाला न भूतो न भविष्यति मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हा विजय भाजपाच्या कठोर परिश्रम, योग्य धोरणे आणि उत्तम नेतृत्वाचे फळ आहे. देवेंद्र फडवणीस यांनी कायमच राज्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या हितासाठी काम केले आणि यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध होईल, अशी मला पूर्ण खात्री आहे असे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले.