नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर आज शुक्रवारी सहा वाजून १९ मिनिटांनी भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच उघडते. त्यानिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
प्रकाशा येथील आठवडे बाजारात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. हे मंदिर वर्षातून एकदाच उघडते म्हणून मोठा उत्सव याठिकाणी साजरा केला जातो. न कार्तिक पौर्णिमेला मंदिर परिसरात विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली • जातात. त्यामुळे मंदिर परिसराला – यात्रेचे स्तरूप येते मंटिगला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर सुसज्ज करण्यात आला आहे.
भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी समितीने बॅरिकेड लावलेले आहेत. महिला व पुरुष यांच्या वेगवेगळ्या रांगांसाठी सोय करण्यात आली आहे.
मंदिर समितीकडून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होमहवन केले जाते. यावर्षीही सकाळी होमहवन मंदिर समितीचे प्रवीण प्रभू माळीच यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बाबू भील, उपाध्यक्ष राजेंद्र मिस्तरी, सचिव रमेश माळीच, सदस्य कैलास माळीच, अरुण भिल, पुण्या भिल, पिंट्या भिल आदींनी माहिती दिली.