मोलगी । प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जांगठी गावात जनावरांच्या चाऱ्याच्या ढिगार्यात 94 हजार रुपये किमतीचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात मोलगी पोलिसांना यश आले.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोलगी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नर्मदा काठावरील जांगठी गावात दीपक रमण्या वळवी राहणार जांगठी तालुका अक्कलकुवा याच्या घराच्या जवळ चाऱ्याच्या ढिगा-यात गोवा व्हिस्की कंपनीची व बियरची 94 हजार 140 रुपयाच्या अवैध मद्य साठा लपवून ठेवण्यात आला.असल्याच्या गुप्त माहितीवरून छापा टाकला असता हा अवैध मद्य साठा मिळून आला आहे.
याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिली असून आरोपी दीपक वळवी हा फरार आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नाईक हे करीत आहेत.यावेळी कारवाई पथकात
सपोनि विश्वास पावरा ,असई युवराज रावताळे,पोह दिलवर पाडवी,पोकॉ राहुल महाले ,पोकॉ मुकेश पावरा, पोकॉ/अनिल नागरगोजे यांचा समावेश होता.