नंदुरबार l प्रतिनिधी-
उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू करणे, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून स्थलांतर थांबवणे आणि जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आपली उमेदवारी आहे.30 वर्ष आमदार व मंत्री असताना मतदार संघात रोजगार नाही.असे सांगत मतदारसंघातील जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता आपण भारावलो असल्याचे प्रतिपादन नंदुरबार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवी यांनी प्रकाशा येथील सभेत केले.
प्रकाशा बसस्थानक परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन
अभिजीत मोतीलाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, वकील पाटील, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जि. प. सदस्य मोहन शेवाळे, समिधा नटावदकर, सुनील गायकवाड, नथू साळवे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) एन. डी. पाटील, माजी उपसरपंच रफिक खाटीक, अमृत ठाकरे, अमृत भिल, वकील पाटील, लोहार, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.
यावेळी किरण तडवी यांनी, स्थानिक ठिकाणीच रोजगार, नंदुरबार एमआयडीसीचा विकास, तापीवरील उपसा जलसिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देणार असल्याचे सांगितले.
प्रकाशा, ता. शहादा येथे महाविकास आघाडीचा प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत मार्गदर्शन करतांना कॉग्रेसचे किरण तडवी. सोबत अभिजित पाटील, जयपालसिंग रावल, अरुण चौधरी, डॉ. समिधा नटावदकर, मोहन शेवाळे, सुनील गायकवाड व विविध पदाधिकारी.
यावेळी महाआघाडीच्या भाजपाच्या उमेदवारावर शाब्दिक हल्ला केला.