नंदुरबार l प्रतिनिधी-
नाशिंदा ता. नंदुरबार येथे श्री पावभा ऋषीची यात्रा यावर्षी सालाबादप्रमाणे ३१ ऑक्टोबर गुरुवारी भरणार आहे.
सालाबादप्रमाणे श्री पावभा ऋषींची यात्रा भरण्यास सुरुवात झाली. नवसा पावनारा श्री पावभा ऋषी म्हणून सर्व ख्याती आहे.येथे नवस फेडीसाठी दर्शनासाठी, नंदुरबार धुळे, जळगाव या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. अस्तंबा ऋषीचे दर्शन झाल्यावर भाविक श्री पावभा ऋषी व राजबाईच्या दर्शनासाठी येथे येतात भगत (सेवक)व भक्त येथे संपूर्ण रात्रभर डांक्या तालावर आपल्या साथीदारासह श्री पावबा ऋषी यांच्या जीवनपटाचा ओव्या व प्रश्नोत्तर रुपात गाऊन रातभर जागरण करतात.
या ओव्यात श्री पावभा ऋषिक जीवनातील प्रसंगांचा उल्लेख ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतर. रात्रभर पावभा ऋषभर मंदिर श्री पावभा ऋषी नावाच्या जय काराने व वाजंत्रीने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. सकाळपासूनच दर्शन व नवस फेडीसाठी भाविकांची गर्दी होते. भगत सेवेकरी हे श्री पावभा ऋषीचे दर्शन व रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी सकाळी.
अक्राळे ता. नंदुरबार येथील श्री. पावभा ऋषीच्या दर्शनाला जातात. नाशिंदे येथील यात्रेत लहान,मोठे पाळणे,हलवायचे, खेळण्याचे, पूजाचे साहित्य आणि नारळाचे दुकान यात्रेत येण्यास सुरुवात झाली आहे.
संस्थाना तर्फे मंदिराची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली आहे .
श्री पावभा ऋषी व राजबाई संस्थान नाशिंद दर वर्षी भाविकांसाठी सोय केली जाते. श्री पावभा ऋषी व राजबाई यांच्या यात्रेत दर्शन, फेडी साठी सोय व नियोजन केले जाते.