नंदुरबार l प्रतिनिधी-
सातपुड्यातील अस्तंबा ऋषी यातील उत्सवासाठी गेलेल्या हजारो भाविकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत ढोल ताशांचा गजरात तळोदा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देवमोगरा माता रामसीता हनुमानाची सजीव देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.घोडा नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी केली होती.
सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी यात्रोत्सवासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश सह गुजरात राज्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव दर्शनासाठी दरवर्षी येत असतात त्यातच तळोदा तालुक्यातील हजारो बांधव दरवर्षी पदयात्रा करत अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी रवाना होत असतात यंदा देखील हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी पाई निघाले असून तळोदा शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आपले पारंपारिक वेशभूषा परिधान करत ढोल ताशांचा गजरात ही भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आदिवासी बांधवांची कुलदैवता देव मोगरा माता या सोबतच राम सीता लक्ष्मण आणि हनुमानाचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता अस्तंबा ऋषींचा जयजयकार करत आदिवासी बांधवांच्या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.