नंदुरबार l प्रतिनिधी-
नवापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डोकारे आदिवासी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावीत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी डोकारे आदिवासी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावीत यांनी नवापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली.
अर्ज दाखल केल्या नंतर नवापूर शहरातून मोठ्या उत्साहात भव्य अशी रॅली निघाली, सदर रॅलीत उमेदवार भरत गावीत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीपराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्की वळवी, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, शिवसेना नवापूर तालुकाध्यक्ष व विसरवाडी सरपंच बकाराम गावीत, नवापूर न.पा राष्ट्रवादी माजी विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे, राष्ट्रवादी नवापूर शहराध्यक्ष मनोहर नगराळे, नवापूर युवा नेते धनंजय गावीत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष मोंटू जैन, राष्ट्रवादी नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी नवापूर शहर पूर्ण राष्ट्रवादीमय झाल्याचे दिसून येत होते.