Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड : डॉ. सुप्रिया गावित

team by team
October 9, 2024
in राजकीय
0
महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड : डॉ. सुप्रिया गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

महिलांच्या सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड असून राज्य सरकार लाडक्या बहिण योजनेचे अनुदान दुप्पट करेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी व्यक्त केला.

 

आधार सिंडींगसाठी येणार प्रश्न मार्गी लावण्यासाठी बॅक अधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या बैठका घेण्यात आल्या असून अशा अडचण येणाऱ्या महिलांची तातडीन मदत करण्याचे आणि त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सुचना देखील देण्यात आल्याचे यावेळी सुप्रिया गावित म्हणाल्या.

 

 

 

त्या महिला व बाल कल्याण विभागाने नंदुरबार शहरातील जीटीपी महाविद्यालयाच्या प्राणंगणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला होता. यावेळी विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, अतिरीक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे , जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी कृष्णा राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कांतालक्ष्मी बनकर आदिसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

त्या पुढे म्हणाल्या, महिला ही उत्कृष्ठ नेतृत्व करणारी आणि व्यवस्थापक असून तिच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्कृष्ठ नियोजन होत असते. कुटुंब चालवण्याची क्षमता एकट्या महिलेत असते. अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांच्या पुढाकारातूनच लाडकी बहीण योजना ही जिल्ह्यातील दोन लाख महिलांपर्यत पोहचली. अंगणवाडी सेविका किंवा मतदनीस ताईंना अंगणवाडी लांब असल्यास त्यांना अंगणवाडी पर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी अडसर होते त्यामुळे त्यांना इलेक्ट्रीक बाईक देवून त्यांचा प्रवास सुकर होईल यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगून या ईलेक्ट्रीक बाईक योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून त्यांना देखील योजनेबाबत साकडे घालणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.

 

 

 

 

सध्या या योजनेचे आलेले पैसे काढण्यासाठी महिला भगिनींना केवायसीबाबत होत असलेल्या त्रासासाठी जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मतदनीस भगिनींची बैठक घेवून त्यांच्याकडून माहीती जाणून घेतली. बॅंकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या या अडचणींचे निरसरण करण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. फिरत्या बॅंकेच्या माध्यमातून महिलांच्या पैसे काढण्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल तसेच जिल्ह्यातील 4 लाख 21 हजार महिला भगिंनींनी लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. यातील 4 लाख 14 हजार महिला भगिनींचे प्रकरणे मंजुर होवून त्यांच्या खात्यावर पैसे देखील पडले आहेत. ज्या महिलांच्या अर्जाबाबत त्रुटी आहेत त्याचे निरसरण देखील लवकर केले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यावेळी बोलतांना म्हणाले, राज्यात अतिदुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील ज्या भागात मोबाईल रेंजची मोठी अडसर आहे अशा विपरीत परिस्थीतीवर मात करत आमच्या अंगणवाडी सेविका आणि मतदनीस ताईंनी दाखवलेल्या तप्तरतेमुळेच अक्कलकुवा धडगाव सारख्या अतिदुर्गम तालुक्यातमध्ये आज 1 लाख 10 हजार महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरुन त्यांना लाभ मिळाला.

 

 

 

 

 

मुख्यमंत्र्यांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे दिलेल्या आदेशानंतर या अतिदुर्गम भागात झालेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत आमश्या पाडवींनी अंगणावडी सेविका आणि मदतनीस ताईचे कौतूक केले. सध्या या योजनेचे पैसे पडले मात्र बॅंकासमोरील पैस काढण्याची गर्दी पाहता नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील रेशन दुकांनामध्ये मिनी बॅंक मुंजर करावी अशी मागणी करत तसा शासन निर्णय देखील झाला असल्याचे सांगत जितके प्रस्ताव आले त्यांना मंजुरी देवून गावस्तरावर मिनी बॅंकेचे माध्यमातून महिलांना गावातच पैसे मिळतील अशी सोय करावी अशी मागणी देखील यावेळी विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी यांनी केली. शासनाने यासोबतच मुलींसाठी मोफत शिक्षण, उच्च शिक्षण, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, बांधकाम कामगारांना घरगुती साहीत्य अशा अनेक कल्याणकारी योजना राबवित असल्याचे देखील सांगितले.

 

 

 

 

 

महिला सक्षमीकरणासाठी राज्यात नंदुरबार जिल्ह्याचे नवा अग्रेसर असून 2001 मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त स्त्री जन्मदराचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात होते. आपला जिल्ह्यात मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जात नाही. या जिल्ह्यात माता मुलींना नारीशक्तीला सर्वात जास्त सन्मान दिला जातो, हे राज्यासाठी उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी माजी खासदार डॉ हिना गावितांनी व्यक्त केले. नवरात्रीच्या पर्वात ही नारी शक्ती एकत्र येणे हा योग दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. चार महिन्यात लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये मिळाले. घरात महिलांना कोणापुढे पैसे मागण्याची गरज पडू नये म्हणून राज्याच्या शासनाने ही योजना राज्यात आणली त्यामुळे सरकारचे महिला भगिनी मनापासून आभार मानत आहे. महिलांच्या सक्षमीकरण, महिला स्वातंत्र्याच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना सर्वाकृष्ठ योजना असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

 

 

 

 

लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी जिल्ह्यामध्ये बॅंकांच्या बाहेर महिलांच्या मोठ्या रांगा उभ्या असल्याचे दिसून येतात. मात्र मोबाईलमधल्या एका अॅपद्वारे देखील केवायसी करता येईल त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी महिलांना मदत करण्याचे आवाहन यावेळी माजी खासदार डॉ हिना गावितांनी केले. यासोबतच जिल्हा परिषदेने नेमलेल्या बॅंक सखीच्या माध्यमातून केवायसीची प्रक्रीया देखील करता येईल. असे यावेळी त्या म्हणाल्या.

 

 

 

 

मागच्या दहा वर्षात जिल्ह्यात फिरती बॅक योजना सुरु करण्यात आली होती. बाजाराच्या दिवशी ती बॅक त्या त्या गावात जावून नागरीकांना पैसे उपलब्ध करुन देण्याचे काम करत होती. ही फिरती बॅक योजना पुन्हा सुरु करुन महिलांना गावातच फिरते बॅकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले पाहीजे असे आवाहन यावेळी माजी खासदार हिना गावितांनी जिल्हा प्रशासनाला केले. यासाठी केंद्रातून काही मदत हवी असल्यास मी प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी देत यामुळे महिलांची तांसन तास रांगेत उभे राहण्यापासून मुक्तता होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

बचत गटाच्या महिलांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एक स्वंतत्र बॅंक उपलब्ध करावी ही मागणी आपण करणार असून ही बॅंक फक्त बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन त्यांचा व्यापार त्यांच्या वस्तुची मार्केटींग करण्यास सुलभता होईल यासाठी फायदेशीर ठरतील असे यावेळी हिना गावित म्हणाल्या.

 

 

 

 

थोडक्यात महत्वाचे…

• यशस्वीनी योजनेच्या पाच महिला भगिनींनी आपली यशोगाठा केली उपस्थित महिला भगिनी समोर सादर.

• डॉ. काणे गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी सादर केले मतदान जनजागृतीवर पथनाट्य.

• कार्यक्रम स्थळी महिला आर्थिक विकास महांडळाच्या माध्यमातून बचत गटांचे 25, आरोग्य विभागाचे 10, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे 13 असे एकून 58 बचत गटाचे स्टॉल थाटण्यात आले होते.

• या मेळा

व्याला जिल्ह्याभरातून महिला भगिनींची मोठी गर्दी.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांच्या बद्दल अभिनेता किरण माने यांची पोस्ट व्हायरल

Next Post

क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरु होता जुगार, सात लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ३७ संशयितांना घेतले ताब्यात

Next Post
क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरु होता जुगार, सात लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ३७ संशयितांना घेतले ताब्यात

क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरु होता जुगार, सात लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ३७ संशयितांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add