Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांच्या बद्दल अभिनेता किरण माने यांची पोस्ट व्हायरल

team by team
October 8, 2024
in राज्य
0
मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण यांच्या बद्दल अभिनेता किरण माने यांची पोस्ट व्हायरल

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

मराठी मनोरंजन क्षेत्रात यश,पैसा,प्रसिद्धी हे कुणाला मिळावं, याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत. टीव्ही रिॲलिटी शो मध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी, गोर्‍यापान, चलाख पोराला ट्राॅफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही… म्हणजे ‘तो विनर नव्हताच’ वगैरे ट्रोलींग होतं, पण ‘चलता है’ असं वाटून विषय संपतो.

 

 

…पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्राॅफी उचलली की लै गदारोळ माजतो. ‘गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय’, ‘त्याला हे यश टिकवताच येणार नाही’ अशा टिप्पण्या सुरू होतात. ‘आता दारिद्र्य दाखवुन रडारडी करा आणि ट्राॅफी मिळवा’ अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्‍यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना ‘उपरा’ वाटतो.

 

 

 

 

सुरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मुळ कारण हे आहे !

 

एक विसरू नका भावांनो, सुरज बिगबाॅसच्या घरात आला, तेच मुळात संपुर्णपणे स्वत:च्या बळावर ! बिगबाॅसच्या ऑफरला सुरूवातीला ‘नाही’ म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता. गांव सोडून तो कधीच कुठे गेला नव्हता. तो इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातलाही नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा.

 

 

 

 

अनेकांनी अशी टीका केलीय की सुरज खेळलाच नाही. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, बिगबाॅस हा ‘टास्क’ खेळण्या-जिंकण्याचा खेळ नाही. बिगबाॅस हा विपरित परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या-बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे. म्हणून तर हिंदी-मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्राॅफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले… पण मनं जिंकलेले लोक प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहेत. अठरा वर्षांपुर्वी बिगबाॅस हिंदीचा पहिला सिझन राहुल राॅयनं जिंकला होता. कुठेय तो? पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एन्टरटेनमेन्ट क्विन आहे आणि रवि किशन भोजपुरीत सुपरस्टार झाला. सुरज ट्राॅफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता आणि केदार शिंदेसारख्या रत्नपारखी माणसानं त्याला सिनेमात हिरो म्हणून घेतलंच असतं !

 

 

 

 

यश-प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे ‘टॅलेन्ट’ पाहिजे, अंगी ‘कर्तृत्व’ पाहिजे आणि तुम्हाला योग्य ती ‘संधी’ मिळाली पाहिजे. या तिन्ही गोष्टींत सुरज यशस्वी ठरला. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते… ती दाखवली तर तो टिकेलही.

 

 

 

…किमान आत्ता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहोणार्‍या बदकांमध्ये गांवखेड्यातनं नितळ-निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला ‘कुरूप वेडा’ ठरवू नका. कदाचित आत्तापर्यन्तच्या काॅमेडियन्स, परफाॅरमर्स, एन्टरटेनर्सना बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक ‘राजहंस’ ठरू शकतो.

 

लब्यू सुरज… होऊन जाऊदे झापुक झुपूक ! ❤️

 

– किरण माने.

बातमी शेअर करा
Previous Post

किरकोळ कारणावरुन पत्नीचा जीव घेणाऱ्या पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड : डॉ. सुप्रिया गावित

Next Post
महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड : डॉ. सुप्रिया गावित

महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहिण योजना ही मैलाचा दगड : डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add