नंदुरबार l प्रतिनिधी-
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना दि.24/09/2024 रोजी आयोजित समितीच्या बैठकीत वरिष्ठ वेतनश्रेणी (चट्टोपाध्याय) व निवडश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी समितीसमोर प्रस्तावित करण्यात आलेल्या 154 प्रस्तावांपैकी 02 प्रस्ताव वरिष्ठ वेतनश्रेणी (चट्टोपाध्याय) चे असून उर्वरित 152 प्रस्ताव निवडश्रेणीचे होते. शासन नियमांनुसार विहीत निकषांची पूर्तता असणारे कागदपत्र प्रस्तावात सादर करणा-या एकूण 02 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली असून 27 पदोन्नती मुख्याध्यापक, 4 केंद्रप्रमुख, 1 पदवीधर शिक्षक व 22 प्राथमिक शिक्षक असे एकूण 54 कर्मचा-यांना निवडश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. उर्वरित 98 प्रस्ताव कायमस्वरुपी अपात्र असल्याने त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही.
वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याच्या प्रकियेत सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रविण देवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पी. एस. कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व श्रीम. वंदना वळवी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक उमेश पाटील व विनायक जाधव यांनी परिश्रम घेतले आहेत.