नंदुरबार l प्रतिनिधी
महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाच्या निर्णयाचे राज्यभरातील राजपूत समाज बांधवांतर्फे स्वागत होत असून राज्य शासनाच्या आभार मानण्यात आले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना प्रलंबित मागण्या संदर्भात
पत्र पाठवले होते. तसेच पाचोरा येथे पुकारण्यात आलेल्या उपोषणास पाठिंबा दिल्याने अखेर लढा दिल्यानंतर यश आले.आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत राज्य शासनातर्फे निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात रणजीतसिंग राजपूत यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळ 15 जानेवारीपर्यंत होईल असे नामदार अतुल सावे यांनी आमदार श्वेता ताई महाले बुलढाणा, तसेच शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा केली. मात्र त्यावर मुहूर्त निघत नव्हता म्हणून राजपूत समाजाचे युवा नेते गिरीश परदेशी यांनी पाचोरा येथे आमरण उपोषण केले होते.याबाबत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व इतर लोक प्रतिनिधींचा यावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता ह्यावर समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष असून त्यावर तातडीने निर्णय होणे बाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दि. 21. 2 .2024 लेखी पत्राद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते.
या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले सन्माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडवणीस व ना. अजित पवार तसेच नामदार अतुल सावे व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले आहेत.