Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

team by team
March 29, 2026
in राज्य
0
चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी-

संतश्री दगाजी बापू यांच्या जन्मस्थान चौपाळे (ता. नंदुरबार) येथून नर्मदा नदीपर्यंत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पायी दिंडी यंदाही उत्साहात सुरू असून दिनांक २३ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान ही पदयात्रा पार पडत आहे. गुजरात राज्यातील नर्मदा किनाऱ्यावर जलसमाधी स्थळापर्यंत जाणारी ही दिंडी भाविकांसाठी श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे.

या पदयात्रेदरम्यान सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी अन्नदान, फराळ, लस्सी, ताक तसेच खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अनेक दाते स्वयंस्फूर्तीने सेवा देत असताना, ज्या ठिकाणी दाते उपलब्ध नसतात, तेथे दिंडी ट्रस्टतर्फे भाविकांची भोजन व निवासाची व्यवस्था केली जाते. यंदाचे दिंडीचे हे ३३वे वर्ष असून संतश्री दगाजी बापू यांच्या कृपेने, संतश्री संतोष चेतन बापू यांच्या नेतृत्वात तसेच दगाजी बापू पदयात्रा दिंडी ट्रस्टचे अध्यक्ष लालचंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा यशस्वीरित्या सुरू आहे. संतश्री दगाजी बापू यांच्या आशीर्वादाने यात्रेला अधिक आध्यात्मिक उर्जा लाभत असल्याचे भाविकांनी सांगितले.

पदयात्रेदरम्यान सकाळी राजपिपला (गुजरात) येथे सेवा फ्रूट सप्लायरतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष लालचंद्र राठोड यांच्यासह  धनराज धनगर, किशोर राठोड, शरद राठोड, राजू पवार, बापू माळी आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात शनिमांडळ येथील भाविकांनी वाहनाद्वारे फराळाची व्यवस्था केली.

 

दरम्यान, ३१ मार्च रोजी गुजरातमधील नर्मदा तीरावर या पायी दिंडीची सांगता होणार असून नर्मदा पूजनानंतर सर्व भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही दिंडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Next Post

गारपीटग्रस्त शेतीची डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

Next Post
गारपीटग्रस्त शेतीची डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

गारपीटग्रस्त शेतीची डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add