Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

team by team
March 27, 2026
in राज्य
0
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील परदेशी पुऱ्यातील श्री राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्त़म प्रभू श्री राम यांच्या जन्म़ोत्स़व निमित्त़ रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषत: महिलांनी या रक्तदान शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आमदार चंद्रकांत रघूवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघूवंशी, उद्योजक मनोज रघूवंशी ,नगरसेवक अमित रघूवंशी , राजेश रघूवंशी,विलास रघूवंशी,आनंद रघूवंशी यांच्यासह परदेशी,रघूवंशी समाजाचे बंधू भगीनी उपस्थित होते.रघूवंशी समाजाच्या भजनी मंडळातील महिलांनी रक्तदान शिबीरात उत्स़फूर्त सहभाग नोंदवला.

नंदुरबार जिल्हयात अपघातात गंभीर जख्मी रुग्णांना रक्त लागते. थॅलेसिमिया रुग्णांना देखील रक्ताची मोठया प्रमाणावर गरज भासते.समाजाचे आपण काही तरी देणे लागतो,हा उदार हेतू ठेवून श्री रामनवमीचे औचित्य़ साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.नगराध्यक्षा रत्ना रघूवंशी यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासली.यावेळी प्रकल्प़ प्रमुख डॉ सुधीर देसाई व रक्तदान शिबीराचे आयोजक आनंद रघूवंशी यांनी रक्तदानाचे महत्व़ विशद करीत रक्तदान करणे किती गरजेचे आहे,याची माहिती दिली. जनकल्याण रक्त़ केंद्राचे प्रकल्प़ अधिकारी डॉ सुधीर देसाई,किशोर तांबोळी,शेखर पाटील,खलील काझी,आकाश जैन,जयश्री पाटील,पोर्णिमा पटले,संजय सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

Next Post

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

Next Post
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add