नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रतिनिधी येथील विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले तसेच दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार मंगेश येवले यांची नंदुरबार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषद कार्यरत आहे. या समितीवर ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून मंगेश येवले यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल मंगेश येवले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवापूर व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष,अखिल भारतीय ग्राहक पंचायत नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष तसेच नवापूर दैनिक पत्रकार संस्थेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असून विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांची ओळख असलेले . मंगेश येवले यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.