नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबारच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रविण महाजन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी परीविक्षाधिन सनदी अधिकारी पवन दत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, प्रमोद भामरे, महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांचा आढावा घेताना आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग या क्षेत्रांसह जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर या विषयावर प्रामुख्याने काम करणार असल्याचे श्रीमती डॉ. सेठी यांनी यावेळी सांगितले.