नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या 25 वर्षांपासून मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना नंदुरबार शहरातील नागरिक मतदान करून निवडून देत आहेत. परंतु, राजकीय द्वेषापोटी शहराच्या विकास कामांना त्यांनी कधीही निधी दिला नाही.नंदुरबारला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा योजना केल्यास त्याचा जनतेलाच भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता द्यावी असे रघुवंशी त्यांनी सांगितले.
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पास निधी दिल्याचे सांगित शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रघुवंशी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विरचक प्रकल्पाला मंत्री डॉ. गावित यांनी निधी दिल्याचे ते सांगत आहेत. या प्रकल्पाला मान्यता 1994 झाली मिळाली. त्यावेळी पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री होते. त्यावेळेस डॉ.गावित हे औरंगाबादला होते. राजकारणात त्यांनी प्रवेशही केला नव्हता.त्यानंतर ते राजकारणात आले. धरणाशी त्यांच्या दुरान्वयेही संबंध नव्हता. 2004 झाली प्रकल्पाच्या पाणीपुरवठा योजनेला मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोध केला होता. त्यावेळेस तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री आर. आर पाटलांनी डॉ.गावितांना पिण्याच्या पाण्यात राजकारण नको म्हणून बजावलं होतं.
… अन् विकास कामांच्या निधी गेला परत*
नंदुरबार नगरपरिषदेकडून सुचवण्यात आलेली विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी झाली होती. परंतु,मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाकडून निधी दिला नाही. त्यामुळे 2022-23 व 2023-24 मध्ये निधी परत गेला होता. त्यानंतर पुन्हा पालिकेने सुचवलेल्या विकास कामांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मान्यता मिळाली होती तेव्हा देखील मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी निधी दिला नाही. अखेर शासनाकडून आलेला निधी परत गेल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
तापी नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला विरोध असणार आहे.नंदुरबार तालुका दुष्काळ असल्यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्न मिटवा यासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना करण्यासाठी प्रकाशा येथील तापी नदी वरून नंदुरबार शहरात एचडीपी पाईप लाईन करण्यासाठी पालकमंत्री अनिल पाटील यांना निवेदन दिले होते.त्यासाठी 15 ते 20 कोटी रुपयांच्या खर्च शासनाला आला असता. प्रकाश येथील तापी नदी वरून नंदुरबारला पाणी आणल्यास त्या योजनेच्या माध्यमातून प्रचंड भुर्दंड सोसावा लागेल. असे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.