नंदुरबार l प्रतिनिधी
तीन राज्यातून चोरलेल्या 15 मोटरसायकली धडगाव पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळबारी येथील रहिवासी श्री. संपत जोमसिंग ठाकरे यांची KTM कंपनीची मोटार सायकल चोरी झालेबाबतची फिर्याद वरुन धडगाव पोलीस ठाणे येथे भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्हयाचा तपास पोना दिपक वारुळे, नेमणुक- धडगाव पोलीस ठाणे हे करीत होते. त्याअनुषंगाने धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांना गुप्त बातमी मिळाली की, धडगाव शहरातील शिक्षक कॉलनी जवळील गुराच्या दवाखान्याजवळ एक संशयित इसम मोटारसायकल विक्रीसाठी येत आहे, त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. पठाण यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले.
धडगाव पोलीस ठाण्याचे पथक हे शिक्षक कॉलनी येथे गुरांच्या दवाखान्याजवळ जाऊन दबा धरुन बसलेले असतांना त्यांना एक इसम पांढ-या रंगाची मोटारसायकल घेऊन येतांना दिसला त्यास पथकातील अंमलदारांनी हात देऊन थांबविले व चौकशी केली असता सदर वाहन चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास विश्वासात घेऊन अधिकची चौकशी करता त्याने त्याचे नाव रेवस ओरजी वळवी रा.छापरी असे सांगितले. सदर इसमाकडे मिळून आलेली मोटारसायकलची पोलीस ठाणे अभिलेखावरील मो. सायकल चोरी गुन्हयाची पडताळणी केली असता ती धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हयातील KTM कंपनीची मोटार सायकल (क्र.MH 39 AM 3125) असल्याची खात्री झाल्याने सदर इसम रेवस ओरजी वळवी यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर बाबत त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे अजुन 4 साथीदार असल्याबाबत रेवस वळवी याने कळविले असुन त्यापैकी एक इसम राहूल हुरता वळवी रा.छापरी ता धडगाव हा देखील साथीदार असल्याचे त्याने कबुली दिली. धडगाव पोलीसांनी एक पथक लागलीच छापरी येथे रवाना केले व सदर राहूल वळवी यास गावातुन ताब्यात घेण्यात आले. सदर दोनही इसमांची कसून चौकशी करता त्यांचेकडून विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या एकुण 15 मोटारसायकली त्यांची एकुण किंमत 11 लाख 39 अशा जप्त करण्यात धडगाव पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण, पोउपनि राहूल पाटील, पोउपनि रामकृष्ण जगताप, पोहवा राजेंद्र जाधव, पोहवा जयेश गावीत, पोहवा स्वप्नील गोसावी, पोना दिपक वारुळे, पोना शशिकांत वसईकर, पोना कालुसिंग पाडवी, पोना योगेश निकम, पोना सुनिलकुमार सुर्यवंशी, पोशि विनोद पाटील, पोशि प्रतापसिंग गिरासे, पोशि हिरालाल सोनवणे, पोशि मनोज महाजन, पोशि विकास चौधरी, पोशि किरण भिल, पोशि किरण पाडवी, पोशि अशोक पाडवी, पोशि जानसिंग वळवी, पोशि देवमन चौधरी, पोशि विश्वजीत चव्हाण, पोशि मनोहर धनगर यांनी केली आहे.