नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी नंदुरबार येथे गेल्या 26 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने. आंदोलकांतर्फे नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनामुळे वाहनांच्या दहा कि.मी पर्यंत रांगा लागल्या होत्या. नऊ ऑगस्ट पर्यंत दाखल न घेतल्यास रेल्वे रोको आंदोलनाच्या इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेणेत यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या 26 दिवसा पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज रोजी नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ सुरत-नागपूर महामार्ग रोखला व रास्ता रोको आंदोलन केले.
या रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 9 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर 9 ऑगस्ट आदिवासी दिवशी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी के. टी. गावित, हिरामण पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्याना पोलिसां कडून अटक करण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.