नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर येथील काकेश्र्वर विद्या प्रसारक संस्था संचलित इंग्रजी माध्यमाची शाळा द फ्युचर स्टेप स्कूल येथे आज रोजी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक भास्करराव हिरामण पाटील कार्याध्यक्ष विजय बोरसे माजी सरपंच सौ बेबीताई पाटील ग्राम पंचायत सदस्या सौ. कविता पाटील संस्थेचे संचालक , हितचिंतक , ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली व चिमुकल्या विद्यार्थ्या हस्ते पालखी तून पादुकांचे मिरवणूक काढून पालखी सोहळ्याचा सजीव देखावा सादर करण्यात आला. तसेच मैदानात विठ्ठल माऊली चे तिलक चे प्रतिकृती तयार करण्यात आली. व नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीेते साठी इंग्लिश मेडीयमचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.आषाढी वारी रिंगण सोहळा महोत्सव उत्साहात साजरा.
क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी वारी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठलाच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक काढून विठू नामाचा जयघोष करीत आपल्या वारकरी परंपरेचा वारसा या निमित्ताने जपून ही आपली अनेक वर्षाची परंपरा कायम असावी असा आहे या मागचा उद्देश होता. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजयराव भास्करराव पाटील, भालेरच्या माजी सरपंच बेबीताई भास्करराव पाटील देविदास पाटील भालेर ग्रा पं विद्यमान सदस्या तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सौ के. सी. पाटील तसेच संस्थेचे हितचिंतक नगावचे शानाभाऊ धनगर, माधवपुरी गोसावी ,रमेश पाटील , अभिमन पाटील, हिम्मत कौतिक पाटील, सुनील पाटील ,काकर्देचे विठोबा माळी , प्राचार्या सौ.विदया चव्हाण, पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर
भालेर, नगाव , होळ,तिशी, काकर्दे , वडवद,जून मोहिदा निंभेल ,वडबारे, आकराळे शिंदगव्हाण येथील प्रतिष्ठित नागरिक व पालक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.व्हि.ईशी यांनी केले.सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.