नंदुरबार l प्रतिनिधी-
जनजाति सुरक्षा मंच सर्वपक्षीय नेते तसेच ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बोगस आदिवासी व जात चोर या विषयावर एक दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
या परिसंवादाचे उद्घाटन म्हणून राजेंद्र म्हरासकोल्हे नागपुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र गावित, डॉ. विशाल वळवी, विरेन्द्र वळवी, डॉ. राजेश वळवी , अँड. गोमती पावरा, अँड. संग्राम पाडवी, सतीश वळवी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. विशाल वळवी यांनी केले. त्यानंतर निवृत्त समाज कल्याण उपायुक्त अरविंद वळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आलेले प्रशासकीय अनुभव आणि बोगस आदिवासींची घुसखोरी याविषयी विश्लेषण मांडतांना मोठ्या प्रमाणात बोगस आदिवासींची घुसखोरी याविषयी समाजातील सर्व घटकांनी जागृत पणे कार्य करावे अशी भूमिका मांडली.
ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र म्हरासकोल्हे यांनी आपली भूमिका मांडताना राज्यातील बोगस आदिवासींच्या विषय हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यात संपूर्ण ताकदीने या संघटनेमार्फत लढा देत आहे. यात 1995 च्या जीआर असून किंवा 1918 च्या याविषयी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयांमध्ये लढा देत आहे. त्याच बरोबर जात पडताळणी समिती यांच्या मार्फत बोगस आदिवासींना दिलेले सर्टीफिकीट रद्द करावे. यासाठी संघटना या समितींना वेळोवेळी तक्रारी आणि आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विरेन्द्र वळवी यांनी केले. यावेळी या लढ्यात सर्व समाजाची सामाजिक व राजकीय वैमनैस्य सोडून या कामात एकजुटीने काम करावे असे आव्हान करण्यात आले.
यावेळी कुवरसिंग वळवी, अर्जुन वळवी, सत्यानंद गावित, गोपाल पाडवी, गुलाबसिंग वसावे, एन. एम. वसावे, प्राध्यापक इंजित पावरा, जलपत वसावे , ईश्वर गावीत , हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन गिरीश वसावे, विनायक गावित, रमेश वसावे, अँड. प्रियदर्शन महाजन , अँड रोहन गिरासे , अँड. अल्पेश जैन , रवि वळवी, वरून गावित, संतोष पाटील, इनेश गावित यांनी परिश्रम घेतले .