नंदुरबार l प्रतिनिधी
हौसेला मोल नाही असे म्हटले जाते. या हौसेखातर
नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याच्या रहिवाशी असलेल्या योगेश गांगुर्डे हे आपला रायडींगचा छंद जोपासण्यासाठी शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाल निघाले आहेत. 17 दिवसात सहा हजार किलोमीटर अंतर पार करणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील वीज वितरण मध्ये कर्मचारी असलेले योगेश गागुर्डे हे बाईक रायडर, वडीलांच्या अकस्मीत निधनाने त्यांच्या जागी अनुकंप तत्तावर नोकरीला लागलेल्या योगेशने आपला बाईक रायडींगचा छंद जीवंत ठेवला आहे. आणि आपला हाच छंद जोपासण्यासाठी ते आपल्या रॉयल एनफिल्डवरुन शहादा ते लेह या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. आज सकाळी सात वाजल्या पासून त्यांनी लेहच्या दिशेने आपला प्रवासाला सुरवात केली आहे.
योगेश आपल्या बाईकवरुन दिवसाला पाचशे ते सहाशे किलोमीटर चा बाईक प्रवास करणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब, जम्मु , श्रीनगर, कारगील, लेह लद्दाख, मनली, दिल्ली मार्ग परत शहादा असा त्यांचा प्रवास असणार आहे. सोळा ते सतरा दिवसांच्या या प्रवासा दरम्यान त्यांनी सर्व जय्यत तयारी केली आहे. गेल्या 10 ते बारा वर्षांपासून ते आपल्या रायडींगचा छंद जोपासत आहेत.
त्यांच्य प्रवासात कुठलीही अडचण येवू नये यासाठीचे साहीत्यासह त्यांनी बरीच मेहनत घ्यावी लागली आहे.
योगेशने याआधीही देशातल्या विविध भागात बाईक रायडींग केली आहे. मात्र शासकीय काम करुन त्याने आपली जींवत ठेवेलला हा छंद त्याच्या धाडसाची प्रचिती देत आहे. सध्या पावसाळ्याच्या ऋतु मध्ये त्यांनी सुरु केलेल ही सफर निश्चितच सुखत राहील हिच अपेक्षा त्याचे मित्रजण आणि परिवारातील सदस्य करत आहे.








