नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभेत दहा वर्षानंतर पुन्हा काँग्रेसने ताब्यात घेतला आहे. दोन वेळच्या खासदार असलेल्या डॉक्टर हिना गावित याचा 1 लाख 59 हजार 120 मतांनी काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांनी पराभव केला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 मध्ये नऊ वेळेचे खासदार असलेल्या माणिकराव गावित यांच्या पराभव करत डॉक्टर हिना गावित विजय झाल्या होत्या. त्यानंतर 2019 साली आमदार ऍड.के.सी.पाडवी यांच्या पराभव करत दुसऱ्यांदा विजयी झाल्या. भाजपाने तिसऱ्यांदा डॉ.गावित यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध ऍड.के.सी.पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. दरम्यान गावित परिवारावर नागरिकांची प्रचंड नाराजी असल्याने त्याचा फायदा गोवाल पाडवी यांना झाला. पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा 2024 मध्ये तब्बल 70% च्या वर मतदान झाले. आज चार मुळे रोजी झालेल्या मतमोजणी काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी डॉक्टर हिना गावित याचा 1 लाख 59 हजार 120 मतांनी पराभव करीत काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला नंदुरबार पुन्हा काबीज केला.
पहिल्या फेरीपासूनच मिळाले मताधिक्य
नंदुरबार लोकसभेसाठी 13 लाख 92 हजार 635 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.आज सकाळी 8 वाजेला पोस्टल मतमोजणी सुरुवात झाली.त्यात डॉ.हिना गावित यांना आघाडी मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाली. पहिल्या फेरीत अखेर काँग्रेसचे एडवोकेट गोवाल पाडवी यांना 19 हजार 390 मतांची आघाडी मिळाली.त्यानंत दुसऱ्या फेरी अखेर 32 हजार 761 मतांनी आघाडी मिळत गेली. अखेरच्या 27 व्या फेरीपर्यंत गोवाल पाडवी यांना प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढतच होते. शेवटच्या फेरी अखेर कॉग्रेस उमेदवार अँड गोवाल पाडवी यांना 7 लाख 45 हजार 998 तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित 5 लाख 86 हजार 878 मते मिळाल्याने काँग्रेसचे गोवाल पाडवी 1 लाख 59 हजार 120 मतांनी विजयी झाले.
चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मताधिक्य
1 ) नंदुरबार विधानसभा
भाजप: १,२७,५२६
काँग्रेस: ९३,५९५
भाजपला ३३,९३१ मतांची आघाडी
२) साक्री विधानसभा
भाजप: ८८,११५
कॉंग्रेस: १,४०,६२०
कॉंग्रेसला ५२,५०५ मतांची आघाडी
३) नवापुर विधानसभा
भाजप: ७९,५७५
काँग्रेस: १,४४,५८३
कॉंग्रेसला ६५,००८ मतांची आघाडी
४) अक्कलकुवा विधानसभा
भाजप: ८४,६२२
काँग्रेस: १,३००३४
कॉंग्रेसला ४५,४११ मतांची आघाडी
५) शहादा विधानसभा
भाजप: ९३,९५९
काँग्रेस: १,३९,७२५
कॉंग्रेसला ४५,७६६ मतांची आघाडी
६) शिरपुर विधानसभा
भाजप: ११२०५०
काँग्रेस: ९६३२२
भाजपाला १५,७२८ मतांची आघाडी
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मध्ये भाजपाच्या उमेदवाराला 70 हजार तर शिरपूरमध्ये 40 हजाराचे मताधिक्य होते.यंदा मात्र नंदुरबार मध्ये जवळपास 36 हजार 69 तर शिरपूर मध्ये 24 हजार 272 इतके मताधिक्य घातले आहे.