नंदुरबार l प्रतिनिधी
प्रोव्हाइड या नावाचे पीआय इंडस्ट्रीज कंपनीचे तणनाशक या औषधावर नंदुरबार जिल्हयात बंदी आणणे बाबत तसेच निकृष्ट वाण व खत विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे ती त्वरित बंद करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सदर निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास शेतकऱ्यांसह शिंगाडे मोर्चा काढून उपोषण करून टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे.
याबाबत शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा महानगरप्रमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की आपल्या जिल्हयात तणनाशक कापुस बियाण्याच्या विक्री बाजुतील राज्यातील एजंट लोकं हे बियाणे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे व नकली वाण जिल्हयात सुळसुळाट आलेला पहावयास मिळत आहे.
आज शेतकरी हा आधीच नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेला असून त्यांची या एजंटा व कृषी दुकानात यांच्यामार्फत फसवणुक होतांना पहावयास मिळत आहे.
तसेच कपाशी, बियाणे, मकई, सोयाबिन आदी विज वानाचे नित्कृष्ट वाण मिळत आहे व खत व तणनाशक फवारणीचे औषधी हे सर्व नकली येण्याची किंवा मिळण्याची शंका आहे म्हणुन बियाण्याचे दुकान व दुकानदार यांर्ची चौकशी करुन चांगल्या दर्जाचे बियाणे व खत औषधी मिळावे हि विनंती. तसेच आपल्या जिल्हयातील खत पुरवठा हा इतर जिल्हयातील तालुक्यात जात आहे त्याचीही चौकशी करुन योग्य ती कारवाई करुन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता यावे हि विनंती.
शासनाकडून कृषी विभागाला आलेल्या योजनांचा निधी अथवा योजना हया शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण पोहचत नाही याचीही ५ ते ६ वर्षाची चौकशी करून करवाई व्हावी.
तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे व अतिवृष्टी, दुष्काळ झालेल्या भागाच्या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामेकरुन नुकसान भरपाई मिळावी. तसेच Provide, प्रोव्हाइड नावाचे पी आय इंडस्ट्रीज P.I. Industries कंपनीचे तणनाशक औषधास नंदुरबार जिल्हयात बंदी आणावी कारण ते औषध अत्यंत महाग असुन कोणत्याही स्वरुपाचे तणनाशकावर या औषधाचा
कार्यवाही झालेली नाही. दुकानदारांचे व कृषी अधिकाराचे साटे लोटे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. भारत देशाचा शेतकरी हा पोषणहार असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे अत्त्याचार होवु नये हि विनंती.
तसेच या निवेदनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही शेतकरी वर्गासह कृषीविभाग यांच्या कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढुन, उपोषण करु व टाळे ठोक आंदोलन करु याची नोंद घ्यावी.
सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांना देण्यात आले निवेदनावर शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, विक्रम हसाणी, विकी वदवाणी, मनोज चौधरी यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, कृषी मंत्री, उबाठा गटाचे विरोधी पक्षनेता,जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार यांना रवाना करण्यात आली आहे.