नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या नवापूर जवळील हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यांवर काल रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकुन १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन याप्रकरणी महाराष्ट्र- गुजरात रात्यातील १६ जणांना अटक केली असुन अनेक जण फरार झाले आहेत.या कारवाई मुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.या धाडीत अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात राज्यातील अनेक प्रतिष्ठीत व्यापार्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या नवापूर जवळील हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यांवर काल रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकुन १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन याप्रकरणी महाराष्ट्र- गुजरात रात्यातील १६ जणांना अटक केली असुन अनेक जण फरार झाले आहेत.या कारवाई मुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.या धाडीत अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात राज्यातील अनेक प्रतिष्ठीत व्यापार्यांचा समावेश आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापुर ते सुरत राष्ट्रीय महामार्ग असलेल्या हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये ५२ पत्याचा झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली.पोलीस विभागाने १० ऑक्टोंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी या ठिकाणी झापा टाकला असता १ लाख ५० हजार ४०० रुपये रोख रुपये व जुगाराचे साहित्य साधने असे एकुण १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कैलास मधुकर दरगुडे यांंच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात मनोज कांतीभाई परमार रा.कमलपार्क सोसायटी , लंबे हनुमान रोड , सुरत , गुजरात , जगदिश ऊर्फ जिग्नेश भिकाभाई पटेल रा. राध्येश्याम सोसायटी , वराच्छा , सुरत , गुजरात , शैलेशभाई मेहुलभाई रंबारी रा. अभय नगर , मारुती चौक , सुरत , गुजरात , तेजस भुपेंद्रभाई मोदी रा.अंबिका नगर , परवत पाटीया डुंबल , सुरत , गुजरात , कौशिकभाई लिलकाभाई गामीत रा. बालपुर , ता . व्यारा , जि . तापी , गुजरात , चंद्रपाल सुकन्नलाल प्रजापती रा.आर्शीवाद हॉटेलचे मागे , टोल नाक्याचे जवळ , सोनगड , ता . सोनगड , जि . तापी , गुजरात , अरुण भाईदास कोकणी रा.पळसी , ता . नवापुर, इसाक ईस्माईल पटेल रा. अलकापुरी , पालेस , ता . कर्जत जि . बडोदा , गुजरात , शशिकांत जयसिंग कोकणी रा.शेही , ता . नवापुर , उमेशकुमार सुकलाल बागुल रा.नवापाडा , ता . नवापुर , हबीब रशीदभाई शेख रा. मोठा डबोच्यावाड , पांझरपोळ , ता . जि . भरुच , गुजरात , सुरेश निंबा मानकर रा.ताराहाबाद , ता . सटाणा , विजयसिंग दिलीपसिंग राणा रा. पहाज , ता . वाघरा , जि . भरुच , गुजरात , स्वप्निल राकेश मिस्तरी रा.टर्नल प्लाट , नवापुर , ता . नवापुर, किरण शांतीलाल चौधरी रा.सोनाभाई नगर , धुळे रोड , नंदुरबार , क्लब मालक सुरज जयस्वाल रा.नवापुर , विपुल ऊर्फ सुरज अश्विन जयस्वाल रा. भवानी चौक , गडी मशिद जवळ , नवापुर व ईतर तीन जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ चे उल्लघंन ५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असुन अनेेक जण छापा पडताच पसार झाल्याची चर्चा आहे.याप्रकरणी पुढील तपास पो.उ.नि. अशोक मोकळ करीत आहे.
सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब साहेबराव भापकर, पो.उ.नि. कैलास दरगुडे , पो.उ.नि. अशोक मोकळ , पो.उ.नि. प्रविण कोळी , अ.स.ई. गुमानसिंग पाडवी , पो.हे. कॉ . विकास पाटील , पो . शि . दिलवर पावरा , पो.ना. दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले , म.पो.शि. शितल धनगर , पो.शि हेमंत सैंदाणे , पो.ना. अरुण कोळी , पो.शि. जितेंद्र रायपुरे , पो.शि. पंकज पाटील , पो.शि. विशाल थोरात , पो.शि. महेश आरंभी , पो.शि. महेश पवार , पो.ना. भटु धनगर , पो.शि. हेमंत बारी यांच्या पथकाने केली आहे.