नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारातून लोखंडी सळई चोरुन नेल्याप्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारातून लोखंडी स्टील बार चोरीच्या संशयावरुन चौघांना अटक करण्यात आली आहे. यात बुध्या रतन पवार, दादा मंगल वळवी , दशरथ उर्फ आला बाजीराव वळवी व भिमा अर्जून पवार यांचा समावेश आहे . याबाबत शेख फरिद शेख गुलाम यांच्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . रविंद्र पवार करत आहेत .