Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रिंट मीडियात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
May 9, 2024
in राज्य
0
प्रिंट मीडियात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

मतदानाच्या एक दिवस अगोदर (12 मे) व मतदानाच्या दिवशी (13 मे) प्रिंट मीडिया मधून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व  प्रमाणन समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असून, त्यासाठी अशा जाहिरातींसाठी  प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या २ दिवस अगोदर अर्ज करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मतदानाच्या दिवशी (13 मे) व मतदानाच्या एक दिवसपुर्वी (12 मे) प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेणेबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये.

राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या 02 (दोन) दिवस आधी जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण प्रमाणिकरण समितीकडे माध्यम कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, 206 नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला टोकरतलावरोड, नंदुरबार 02564-210015 यांच्याकडे अर्ज करावा.

भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, संबंधित संस्था व व्यक्ती यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हानिवडणूक अधिकारी  मनीषा खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

साक्रीत गोवाल पाडवींचा जोरदार प्रचार

Next Post
साक्रीत गोवाल पाडवींचा जोरदार प्रचार

साक्रीत गोवाल पाडवींचा जोरदार प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add