नंदुरबार l प्रतिनिधी
साक्री तालुक्यात मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले मताधिक्य प्राप्त झाले होते. यावेळी मात्र साक्रीतून सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे.
याचसाठी सातत्याने गोवाल पाडवींचे साक्रीत दौरे पार पडत आहेत. काल साक्री तालुक्यातील सिनबंद, छडवेल, निजामपुर, जैताने, आंबेमोहोर, खुडाने, दमखडी, नोवापाडा, पांगन, डुक्करझिरे, बर्डीपाडा, आमाळी तीर्थक्षेत्र, रोहोड, याठिकाणी भेटी दिल्या.
तसेच पिंपळनेर आणि म्हसदी येथे आयोजित करण्यात आलेली भव्यसभा ही काँग्रेसला प्रचंड बूस्ट देणारी ठरणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, शाम सनेर यांच्या सारखे दिग्गज नेते काँग्रेस प्रचारात उतरल्याने काँग्रेसला मोठी आघाडी साक्रीतून मिळणार हे निश्चित झाले आहे.








