Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळे येथे शेतात लागलेल्या आगीत ४० क्विंटल मका जळून खाक

team by team
May 2, 2024
in क्राईम
0
रजाळे येथे शेतात लागलेल्या आगीत  ४० क्विंटल मका जळून खाक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील शेत शिवारामध्ये शेतकरी कृष्णा झगा वाघ यांच्या दोन एकर क्षेत्रातील पिकवलेला ४० क्विंटल मका जळून राख झाल्याची घटना दि.३० एप्रिल रोजी घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच सरपंच राजू मराठे यांनी पाहणी करून संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली असता दि.१ मे रोजी प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे तसेच विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी येऊन आग लागलेल्या मक्याची पाहणी केली आहे. शेतकरी कृष्णा वाघ यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा 40 क्विंटल मका जळून नुकसान झाले आहे.

नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही मात्र मका ज्या जागेवर साठवून ठेवलेला असता त्या नजीकच वीज तारा असल्याने विद्युत तारांचा घसरण झाल्याने ठिणगी पडून आग लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मकईला आग लागताच परिसरातील शेतकरी व कृष्णा वाघ यांच्यासह त्यांची मुल यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते.

त्यातच कडाक्याचे ऊन असल्याने आग विझवण्यास अडचणी येत होत्या मात्र मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मका पूर्ण जळून खाक झाला. शेतकरी कृष्णा वाघ यांचे अतोनात नुकसान झाल्याने ऐन हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे खा.डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबार दौरा निश्चित; 10 मे रोजी डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी होणार भव्य जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add