नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे भाजपाच्या उमेदवार खा.डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपा तर्फे खा. डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा क्षेत्रात खासदार डॉ. हिना गावित यांचे झंझावात दौरे सुरू आहेत. सात मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे सभा घेणार आहेत या सभेला एक लाखापेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ते नंदुरबार येथे नमो संवाद बैठकीसाठी उपस्थित होते बैठकीनंतर यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतील वाद लवकर संपुष्टात येऊन नंदुरबार लोकसभेत खासदार डॉक्टर हिना गावित या दोन लाख मतांनी विजयी होतील असेही त्यांनी सांगितले