Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नगरपालिकेचा प्रशासकीय कारभाराविरूध्द भाजपाची फलकबाजी वेधतेय नागरीकांचे लक्ष

team by team
October 9, 2021
in आरोग्य
0
नगरपालिकेचा प्रशासकीय कारभाराविरूध्द भाजपाची फलकबाजी वेधतेय नागरीकांचे लक्ष
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गिरीविहार गेटवर मोकाट जनावरांमुळे एका व्यापार्‍याला नाहक प्राण लागला आहे.याबाबत नागरिकांमधून नगरपालिके विरोधात संतप्त भावना व्यक्त होत असतानाच शहरातील विविध भागात भारतीय जनता पार्टीने आणखी किती बळी घेणार ? असा जाहीर प्रश्न विचारणारे फलक शहराच्या विविध भागात लावल्यामुळे नगरपालिकेचा प्रशासकीय कारभारही चर्चेत आला आहे. मोकाट जनावरांमुळे होणारे मृत्यू आणि त्यांची दहशत थांबवणार कधी? डेंग्यूसदृश आजार  फैलावणारे अनारोग्य संपवणार कधी? कुत्र्यांमुळे मरणारे जीव वाचवणार कधी? या फलकाच्या माध्यमातुन नंदुरबार पालीकेला जाहीरपणे प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. नंदुरबार शहराच्या विविध भागात हे फलक लावण्यात आले आहेत.

नंदुरबार शहरात मोकाट गुरांमुळे नागरीक हैराण झाले आहेत.विविध चौकात मोकाट जनावरे रस्ता अडवून बसल्याचे चित्र दिसेत त्याचबरोबर भर बाजारात धुडगूस घालतात. मागील तीन-चार वर्षात ही समस्या अधिक उग्र बनली आहे. मोकाट जनावरे तोंड घालत असल्यामुळे तसेच अचानक धावत येऊन धडक देत असल्यामुळे लॉरीवर अथवा बाजारात बसून विक्री करणार्‍यांना अनेकदा आर्थिक फटका सहन करावा लागतो. या मोकाट गुराढोरांना पकडून नगरपालिकेने कडक कारवाई करावी तसेच त्यांना बंदिस्त करण्याची कायमची सोय करावी; अशा मागण्या वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा केली. त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेवकांनी सुद्धा सभागृहात विषय मांडले. तथापि उपाय होत नसल्यामुळे नगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर सातत्याने रोष व्यक्त केला जात आहे. अशातच जनावरांची झुंज चालू असताना धडक बसून गिरीविहार गेटवर मध्य प्रदेशातील एका व्यापार्‍याला प्राण गमवावा लागला.नंदुरबार नगरपालिकेच्या व्यवस्थापनाचा गलिच्छ कारभार याला जबाबदार असून यावर संतप्त प्रतिक्रिया बाजारपेठेत उमटली आहे. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुद्धा असाच त्रासदायक बनला आहे. किती बळी गेले हे नगरपालिकेलाही माहित आहे. कोणत्याही वसाहतीत औषध फवारणी करायची नाही, कीटकनाशक टाकायचे नाही, नियमित स्वच्छता करायची नाही हे जणू नगरपालिकेने ठरवून घेतले आहे. परिणामी शहरात डेंग्यूसदृश साथ चालू आहे अनेकांचा बळी जात आहे. निगरगट्ट नगरपालिका प्रशासनाला म्हणूनच विविध भागात फलक लावुन जाहीर प्रश्न विचारावा लागला असे भारतीय जनता पार्टीचे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव

Next Post

महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add