नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी दरम्यान अनेक गुन्हांची उकल होऊन मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांना अटक ही करण्यात आली. या कामाचे राज्यभर नंदुरबार पोलीस दलाचे कौतुक करण्यात आले. या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 38 पोलीस अमंलदार यांचा प्रातिनिधिक स्वरुपात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला .
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक 2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात दि. ३ ते दि.5 ऑक्टोंबर दरम्यान ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी योजना राबविण्यात आले होती . ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हे साजरे होणारे सण व पोट निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असा उद्देश होता . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस ऑपरेशन ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी योजना राबविण्यात आले होते , त्या दरम्यान बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या विरुध्द 1 गुन्हा , बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे 21 तलवार , 1 चाकु , 1 फायटर बाळगणाऱ्या विरुध्द 3 गुन्हे , चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 11 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 11 गुन्हे , एका संशयीत इसमाच्या ताब्यात चोरीची मोटर सायकल मिळुन आल्या त्यांच्या विरुद्ध नवापुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . 2 पाहिजे आरोपी अटक , 1 हद्दपार इसमास अटक , त्याचप्रमाणे 96 अजामीनपात्र वॉरंटमध्ये आरोपींना अटक , 61 जामीनपात्र वॉरंट , 1 स्टँडींग वॉरंटची बजावणी करण्यात आली होती . नंदुरबार जिल्ह्यातील 78 हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले तसेच नाकाबंदी दरम्यान 328 वाहनांची तपासणी करुन 195 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती . ” ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कौतुक केले गेले आणि या कौतुकाचे खरे हक्कदार यांचा गौरव केला पाहिजे म्हणून ऑल ऑऊट, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 38 पोलीस अमंलदार यांचा प्रातिनिधिक स्वरुपात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशात पोलीस अमंलदारांचा सिंहाचा वाटा असुन त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत , म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच भविष्यात देखील पोलीस अमंलदारांनी अशीच कामगिरी करावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता . “या कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अतुल बिऱ्हाडे , भटु धनगर, उपनगर पोलीस ठाण्याचे अनिल सैंदाणे, नवापुर पोलीस ठाण्याचे विकास पाटील , दादाभाऊ वाघ , विश्वास साळुंखे , योगेश तनपुरे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे दिलीप गावीत , किरण वळवी, शहादा पोलीस ठाण्याचे काळुराम चौरे , दिपक परदेशी , मेहरसिंग वळवी , रामा वळवी , किरण पावरा , भरत उगले, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस चुनिलाल ठाकरे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे गोविंद जाधव , अमोल खवळे , कपिल बोरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक गोरे , महेंद्र नगराळे , जितेंद्र तांबोळी , राकेश मोरे , जितेंद्र अहिरराव , दादाभाई मासुळ , मोहन ढमढेरे , पुरुषोत्तम सोनार , विकास कापुरे , जितेंद्र तोरवणे , विजय ढिवरे , अभय राजपुत , आनंदा मराठे , शोएब शेख , किरण मोरे , यशोदिप ओगले , अभिमन्यु गावीत , रामेश्वर चव्हाण , राजेंद्र काटके या अमंलदारांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला . या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , उपविभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते .