Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

team by team
August 16, 2026
in शैक्षणिक
0
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ईलाताई गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, सचिव डॉ. विभूती गावित, सचिव ऋषिका गावित यांच्यासह के. डी. गावित शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व दिमाखदार पथसंचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने कार्यक्रमस्थळी देशभक्ती व राष्ट्राभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी चिराग पावरा, अमित वसावे, ध्रुव जाधव आणि रोहित राऊत या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. त्यानंतर के. डी. गावित इंग्लिश मीडियम स्कूलच्या विध्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमात ऋषिका गावित, डॉ. विभूती गावित व ईलाताई गावित यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यालयीन जीवनातील स्वातंत्र्यदिनाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, “माणसाला कामाचे, परिश्रमाचे वेड लागले पाहिजे. कामावर निष्ठा, श्रद्धा आणि विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास विकसित भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील यांनी केले.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

Next Post

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

Next Post
खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add