नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गिरीविहार गेटवर मोकाट जनावरांमुळे एका व्यापार्याला नाहक प्राण लागला आहे.याबाबत नागरिकांमधून नगरपालिके विरोधात संतप्त भावना व्यक्त होत असतानाच शहरातील विविध भागात भारतीय जनता पार्टीने आणखी किती बळी घेणार ? असा जाहीर प्रश्न विचारणारे फलक शहराच्या विविध भागात लावल्यामुळे नगरपालिकेचा प्रशासकीय कारभारही चर्चेत आला आहे. मोकाट जनावरांमुळे होणारे मृत्यू आणि त्यांची दहशत थांबवणार कधी? डेंग्यूसदृश आजार फैलावणारे अनारोग्य संपवणार कधी? कुत्र्यांमुळे मरणारे जीव वाचवणार कधी? या फलकाच्या माध्यमातुन नंदुरबार पालीकेला जाहीरपणे प्रश्न विचारण्यात आले आहेत. नंदुरबार शहराच्या विविध भागात हे फलक लावण्यात आले आहेत.

नंदुरबार शहरात मोकाट गुरांमुळे नागरीक हैराण झाले आहेत.विविध चौकात मोकाट जनावरे रस्ता अडवून बसल्याचे चित्र दिसेत त्याचबरोबर भर बाजारात धुडगूस घालतात. मागील तीन-चार वर्षात ही समस्या अधिक उग्र बनली आहे. मोकाट जनावरे तोंड घालत असल्यामुळे तसेच अचानक धावत येऊन धडक देत असल्यामुळे लॉरीवर अथवा बाजारात बसून विक्री करणार्यांना अनेकदा आर्थिक फटका सहन करावा लागतो. या मोकाट गुराढोरांना पकडून नगरपालिकेने कडक कारवाई करावी तसेच त्यांना बंदिस्त करण्याची कायमची सोय करावी; अशा मागण्या वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा केली. त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेवकांनी सुद्धा सभागृहात विषय मांडले. तथापि उपाय होत नसल्यामुळे नगरपालिकेच्या अधिकार्यांवर सातत्याने रोष व्यक्त केला जात आहे. अशातच जनावरांची झुंज चालू असताना धडक बसून गिरीविहार गेटवर मध्य प्रदेशातील एका व्यापार्याला प्राण गमवावा लागला.नंदुरबार नगरपालिकेच्या व्यवस्थापनाचा गलिच्छ कारभार याला जबाबदार असून यावर संतप्त प्रतिक्रिया बाजारपेठेत उमटली आहे. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुद्धा असाच त्रासदायक बनला आहे. किती बळी गेले हे नगरपालिकेलाही माहित आहे. कोणत्याही वसाहतीत औषध फवारणी करायची नाही, कीटकनाशक टाकायचे नाही, नियमित स्वच्छता करायची नाही हे जणू नगरपालिकेने ठरवून घेतले आहे. परिणामी शहरात डेंग्यूसदृश साथ चालू आहे अनेकांचा बळी जात आहे. निगरगट्ट नगरपालिका प्रशासनाला म्हणूनच विविध भागात फलक लावुन जाहीर प्रश्न विचारावा लागला असे भारतीय जनता पार्टीचे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी सांगितले.