Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बलिकेच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला माजी, आ.रघुवंशीनी केले कौतुक

Mahesh Patil by Mahesh Patil
October 9, 2021
in सामाजिक
0
बलिकेच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला माजी, आ.रघुवंशीनी केले कौतुक

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथे स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर योग्यवेळी बंद करुन आपल्या घराचे नुकसान वाचवण्याचा प्रयत्न पहिलीत शिकणार्‍या बालिकेने केला. याबद्दल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड.राम रघुवंशी यांनी या बालिकेचे कौतुक केले.

याबाबतची माहिती अशी, शहरातील कोकणी हिल परिसरातील गंगानगर भागात शिक्षक अशोक कागणे व पोलीस कर्मचारी वैशाली कागणे राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त पती-पत्नी दोघेही बाहेर गेले. सौ.वैशाली कागणे यांनी नेहमीचा स्वयंपाक केला आणि नोकरीच्या वेळेच्या गर्दीमुळे त्या पटकन निघून गेल्या. जाताना त्यांच्याकडून गॅसचे बटण खुले राहिले. पी.जी.पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत शिकणारी कन्या साईश्वरी घरी होती. अन्य कोणीही घरी नव्हते. तिला घरात गॅस सुरू असावा आणि त्यातून वास येत आहे याची जाणीव झाली. तिला नेमके कोणते बटण कसे बंद करावे याची माहिती नव्हती. मात्र आपण किमान दरवाजे खिडक्या उघडाव्यात, जेणेकरून वास बाहेर जाईल या भावनेने तिने दरवाजा खिडक्या उघडल्या. शेजारीच राहणार्‍या नितल पाटील यांच्याशी तिने संपर्क साधला व त्यांना आपल्या घरी बोलावले. श्रीमती पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गॅसचे बटन बंद केले आणि सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या.

बालिकेच्या प्रसंगावधानामुळे कागने कुटुंबावर येणारा मोठा भीषण प्रसंग टळला. केवळ त्यांचेच घर नाही तर परिसरालाही त्याचा धोका निर्माण झाला असता. ही घटना सांगताना तिची आई वैशाली व शेजारी राहणार्‍या नितल या दोघेही भावनाविवश होतात.

श्रीमती कागणे ह्या पोलीस कर्मचारी आहेत. आपल्या मुलीच्या या प्रसंगावधानाची माहिती त्यांनी आपल्या सहकार्‍यांना दिली. त्याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी श्रीमती कागणे यांच्याकडून वस्तूस्थिती समजून घेतली व साईश्वरीचा सत्कारही केला. त्याचप्रमाणे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य ऍड.राम रघुवंशी यांनी देखील तिचा सत्कार केला. तिच्या या समयसूचकतेचे परिसरातही कौतुक होत आहे. तिचे प्रशिक्षक रहीम शेख, सर्पमित्र विशाल नागरे यांनी तिचे विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे आज पुरुषोत्तम पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव

Next Post
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या ३८ पोलीस अमंलदारांचा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

January 26, 2023
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहनाला धडक ; दोन ठार

January 26, 2023
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

उमर्दे येथे शिवीगाळ करुन दमदाटी

January 26, 2023
सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

January 26, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

January 26, 2023
स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित

स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित

January 26, 2023

एकूण वाचक

  • 2,683,884 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group