नंदुरबार l प्रतिनिधी
उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या शेकडो शहरवासीयां समवेत मिरवणुकीने चालत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी आज 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी गणपती मंदिरात श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवला आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदारपणे शुभारंभ केला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ. हिनाताई गावीत या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी करीत असून लाखो नागरिकांच्या उस्फुर्त सहभागाने नामांकन दाखल करण्यासाठी काढण्यात आलेली त्यांची रॅली सध्या चर्चेचा विषय बनली होती. गावागावात भेटी चर्चा आणि कॉर्नर सभाही त्यांच्या वतीने केल्या जात आहेत.
दरम्यान आज 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर डॉ. हिनाताई गावित यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा त्यांचे पिताश्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या समवेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ केला. आधी विधिवत श्री गणपतीचे पूजन आणि प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर नारळ वाढविण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समावेत रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, आनंद माळी, ॲड.चारुदत्त कळवणकर, श्याम मराठे, माजी नगरसेवक गौरव चौधरी, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा युवा नेते सुभाष पानपाटील, भीम सिंग राजपूत आणि महायुतीतील घटक पक्षांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी होते.
या रॅली दरम्यान डॉक्टर हिनाताई गावित यांनी शहीद स्मारक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबून अभिवादन केले. ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी आणि तत्सम मान्यवरांच्या घरी भेट दिली. माजी नगराध्यक्षा इंदू काकू चौधरी, माजी नगरसेविका सौ अनिता पाटील यांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.