Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माझेच नुकसान होत आहे. डॉ.हिना गावित यांच्या भेटीनंतर असे का म्हणाले मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
April 27, 2024
in राजकीय
0
माझेच नुकसान होत आहे. डॉ.हिना गावित यांच्या भेटीनंतर असे का म्हणाले मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात भाजपा, शिंदेची शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती आहे. महायुतीतर्फे लोकसभा एकत्रितपणे निवडणूक लढवीत आहे असे असले तरी नंदुरबार मध्ये महायुतीमध्ये संघर्ष सुरूच असून जिल्ह्यातील महायुतीतील संघर्षाकडे राज्यस्तरीय नेत्यांनीही पाठ फिरवली आहे. असे असताना आज भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांनी महायुतीचे मित्र पक्षातील प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेचे जिल्हा नेते मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली त्यांच्यात बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली असली तरी संघर्षाला पूर्णविराम वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे निश्चित झाले.

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा नेते आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित व शिंदे शिवसेनेचे नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यात संघर्ष आहे. भाजपाने लोकसभेसाठी डॉ.हिना गावीत यांना उमेदवारी दिली.डॉ.हिना गावीत यांच्या उमेदवारीला शिंदे शिवसेनेतर्फे विरोध होतच होता. शिंदे गटाचे विविध पदाधिकारी हे काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसून आले होते तर काही पदाधिकारी उघडपणे काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांचा प्रचार करीत आहेत.

 

दरम्यान आज महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासीयांना धक्का देणारी ठरली आणि त्यामुळेच रघुवंशी व गावित यांची भेट शहरवासीयांच्या चर्चेची सुद्धा बनली.

 

चंद्रकांत रघुवंशी यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, आनंदा माळी, माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी बंद दाराआड खा. गावित व श्री.रघुवंशी यांच्या मध्ये चर्चा झाली.
चर्च नंतर खा.हिना गावित यांनी दोन दिवसात यावर प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.

 

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240427-WA0010.mp4
https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240427-WA0011.mp4

तर मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, राज्यात भाजपा व शिंदे शिवसेना एकत्र सतेत्त आहे.मात्र नंदुरबार जिल्ह्यात दोघांमध्ये तीव्र संघर्ष आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आम्हाला आमंत्रण दिले. लवकर आमंत्रण मिळाले असते तर संघर्षाची तीव्रता कमी झाली असती असे सांगत.याबाबतीत आता पर्यंत वरिष्ठांचा फोन आलेला नाही.त्यामुळे याबाबतची भूमिका वरिष्ठ पातळीवरच सुटेल असेही श्री. रघुवंशी म्हणाले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्यूज:अखेर डॉ.हिनाताई गावित व शिवसेनेचे जिल्हा नेते मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे झाले मनोमिलन ?

Next Post

श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून डॉ.हिना गावित यांनी केला प्रचाराचा जोरदार शुभारंभ

Next Post
श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून डॉ.हिना गावित यांनी केला प्रचाराचा जोरदार शुभारंभ

श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून डॉ.हिना गावित यांनी केला प्रचाराचा जोरदार शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add