Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.जयंत शाह यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

team by team
April 19, 2024
in राष्ट्रीय
0
डॉ.जयंत शाह यांची राष्ट्रीय स्तरावर निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बालरोगतज्ज्ञ, शैशव हॉस्पिटलचे संचालक डॉ.जयंत शाह यांची नॅशनल निओनॅटोलॉजी फोरम ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय स्तरावर गठित १३ सदस्यीय समितीत निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याला हा मान प्रथमच मिळाला आहे. डॉ.जयंत शाह यांचे अनेक वर्षांचे शिशुपोषण या क्षेत्रातील कार्य बघून ही निवड झालेली आहे.

डॉ.जयंत शाह २०२४-२०२५ या दोन वर्षांसाठी इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या आयवायसीएफ चाप्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या आधी त्यांनी दोन वर्षे सचिव व दोन वर्षे उपाध्यक्ष अशा जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. तसेच त्यांनी बीपीएनआय महाराष्ट्रचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. नंदुरबारसारख्या लहान गावातून राष्ट्रीय स्तरावर असे बहुमान मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. IAP ही बालरोगतज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना आहे.

त्यातील आयवायसीएफ चाप्टरचे शिशुपोषण या विषयावर कार्य करते. त्या संघटनेचे डॉ.शाह राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ही संघटना विविध राष्ट्रीय शिफारसी तयार करणे, त्या देशातील बालरोगतज्ज्ञांपर्यंत पोहोचवणे व विविध सेमिनार, वेबिनार, कॉन्फरन्स इ.आयोजित करणे ही कामे करते. डॉ.जयंत शाह यांचा अध्यक्षीय अजेंडा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व बालरोगतज्ज्ञांपर्यंत स्थानिक भाषेत माहिती, व्हिडिओ, रील्स् असे आधुनिक मिडिया यांचा वापर करून पोहोचायचा आहे. NNF (National Neonatology Forum of India) नवजात बालकांच्या स्वास्थ्यावर काम करते. डॉ.शाह हे महाराष्ट्र आयपीएचे कार्यकारी सदस्य सुद्धा आहेत. देशातील पुढची पिढी अधिक सुदृढ व्हावी या दृष्टिकोनातून काम करणार्‍या या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेमध्ये डॉ.शाह यांचे महत्त्वाचे योगदान ठरणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी हा एक बहुमान आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डिस्ट्रिक फोरमचा पुढील अध्याय ?

Next Post

नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दिवशी ३० नामांकनांची विक्री

Next Post
नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दिवशी ३० नामांकनांची विक्री

नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दिवशी ३० नामांकनांची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add