नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजल्यानंतर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल हे दोन्ही नेते सध्या तरी ‘न्यूट्रल’असल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव आपली भुमिका जाहीर करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी शहरातील प्रेस मारुती मैदानावर आज ता.१९ सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्याला उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका विशेषता आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात प्रत्येक राजकीय पक्षात गटातटाचे राजकारण चालूच असते. लोकसभेच्या बिगुल वाजल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह कोणी शिंदे गटात तर कोणी भाजपात दाखल झाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व जयपालसिंह रावल हे दोन्ही नेते परस्परांचे राजकीय विरोधक असूनही डॉ. हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती हे सर्वश्रुत आहे. गांव परिसर पिंजून काढला होता. २०१९ ला डॉक्टर हिना गावित मोठ्या मताधिक्याने ही निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्यात परस्परांमध्ये राजकीय मतभेद होते.
परंतु २०१९ चा निवडणूकीत डॉक्टर गावित हेच आपले नेते म्हणून दोन्ही नेत्यांनी स्वतंत्ररित्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार करून त्यांच्या पारड्यात आपापल्या कार्यकर्त्यांची मते टाकली. मीच खरा निष्ठावान म्हणून दोघांमध्ये निवडणुकी दरम्यान तू -तू मै -मै ही झाली होती. परंतु कालांतराने आपसातील वैरभाव मिटवत हे दोन्ही नेते एकत्रित आले. व डॉक्टर गावित परिवाराशी दोघांचे राजकीय फारकत झाली. ते आजतागायत आहे. त्यामुळे यंदाचा निवडणूकीत डॉक्टर हिना गावित यांना मदत करतात की काँग्रेसचे गोवाल पाडवी तथा अन्य कोणाला याविषयी उत्सुकता लागून आहे.