नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बालरोगतज्ज्ञ, शैशव हॉस्पिटलचे संचालक डॉ.जयंत शाह यांची नॅशनल निओनॅटोलॉजी फोरम ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय स्तरावर गठित १३ सदस्यीय समितीत निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याला हा मान प्रथमच मिळाला आहे. डॉ.जयंत शाह यांचे अनेक वर्षांचे शिशुपोषण या क्षेत्रातील कार्य बघून ही निवड झालेली आहे.
डॉ.जयंत शाह २०२४-२०२५ या दोन वर्षांसाठी इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या आयवायसीएफ चाप्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या आधी त्यांनी दोन वर्षे सचिव व दोन वर्षे उपाध्यक्ष अशा जबाबदार्या पार पाडल्या आहेत. तसेच त्यांनी बीपीएनआय महाराष्ट्रचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. नंदुरबारसारख्या लहान गावातून राष्ट्रीय स्तरावर असे बहुमान मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. IAP ही बालरोगतज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना आहे.
त्यातील आयवायसीएफ चाप्टरचे शिशुपोषण या विषयावर कार्य करते. त्या संघटनेचे डॉ.शाह राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ही संघटना विविध राष्ट्रीय शिफारसी तयार करणे, त्या देशातील बालरोगतज्ज्ञांपर्यंत पोहोचवणे व विविध सेमिनार, वेबिनार, कॉन्फरन्स इ.आयोजित करणे ही कामे करते. डॉ.जयंत शाह यांचा अध्यक्षीय अजेंडा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व बालरोगतज्ज्ञांपर्यंत स्थानिक भाषेत माहिती, व्हिडिओ, रील्स् असे आधुनिक मिडिया यांचा वापर करून पोहोचायचा आहे. NNF (National Neonatology Forum of India) नवजात बालकांच्या स्वास्थ्यावर काम करते. डॉ.शाह हे महाराष्ट्र आयपीएचे कार्यकारी सदस्य सुद्धा आहेत. देशातील पुढची पिढी अधिक सुदृढ व्हावी या दृष्टिकोनातून काम करणार्या या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेमध्ये डॉ.शाह यांचे महत्त्वाचे योगदान ठरणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी हा एक बहुमान आहे.