नंदुरबार l प्रतिनिधी
यंदाच्या निवडणुकीत साक्री तालुका कुणीकडे झुकणार? ही चर्चा सध्या जोर धरत असण्याबरोबरच साक्री तालुक्याचा विकास घडवायला भाजपाच्या सत्तेचा कसा लाभ झाला? यावरही चौका चौकातील चाय पे चर्चा रंगताना दिसत आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत साक्री तालुक्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांना मोठे मताधिक्य देणारी भूमिका निभावली होती. 2019 च्या निवडणुकीत मात्र याच तालुक्याने काँग्रेस उमेदवाराला काही अंशी साथ दिली होती. असे असतानाही खासदार डॉक्टर हिना गावित यांनी खासदारकीच्या माध्यमातून या तालुक्यात भरमसाठ विकास काम केल्याचे या पाच वर्षात पाहायला मिळाले. सध्या हाच लोक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी घेतलेल्या मेळाव्यात शिंदे गटासह सर्व गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित दिसले.
नंदुरबार लोकसभेचे उमेदवार खा. डॉ. हिना गावित यांच्या प्रचार नियोजनासाठी महायुतीच्या मेळावा साक्री येथे 16 एप्रिल रोजी संपन्न झाला. मेळाव्यास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, आ मंजुळा गावित, भाजप धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे, विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सूर्यवंशी भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील यांनी केले. मेळाव्यास महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साक्री तालुक्यात खासदारांमुळे झाला ‘हा’ विकास
आतापर्यंत साक्री तालुक्यातील 3 हजार हून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले. जवळपास 50 हजार गृहिणींना मोफत गॅस मिळवून दिले. साक्री तालुक्यातील 10 उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळवून दिला. साक्री तालुक्यात लहान लहान गावांना पंधरा लाख-वीस लाख याप्रमाणे नुसत्या कॉंक्रिटीकरणाच्या 15 रस्त्यांसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी दिला. ग्रामविकास विभाग योजनेतून 25 गावांना सव्वाचार कोटीहून अधिक रुपयांचा निधी देऊन सभा मंडप उभारले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील 4 रस्त्यांसाठी 2739 लक्ष रुपये तसेच साखरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. साक्री तालुक्यातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारावे म्हणून 40 हून अधिक मोबाईल टावरला मंजुरी मिळवून दिली. यासह विविध योजनांच्या माध्यमातून साक्री तालुक्याच्या विकासासाठी काय केले, याची उजळणी उपस्थितांनी केली.