नंदुरबार l प्रतिनिधी
– समस्त भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पावन जन्म दिवस देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत असतानाच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात देखील खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते महाआरती करून रामनवमी चा महाउत्सव साजरा करण्यात आला. जय जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला.
तळोदा येथे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात आली. जल्लोषात पार पडलेल्या या रामनवमी महोत्सवात खा.डॉ. हिना गावित, भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी, योगेश चौधरी, गौरव वाणी, विलास डांबरे, हेमलाल मगरे, शिरीष माळी,
यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिवंत देखावे आणि चित्ररथ यांनी लक्ष वेधले. तळोदा येथील या उत्सवामध्ये शेकडोच्या संख्येने राम भक्तांनी सहभाग घेतला. राम भक्तांच्या उपस्थितीने प्रमुख रस्ते व्यापले होते.
दरम्यान “जय श्रीराम”च्या दणकेबाज घोषणा देत शहाद्यातील रामभक्तांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत अत्यंत जल्लोषात राम नवमी साजरी केली. लेझर किरणांच्या सहाय्याने सुशोभित केलेल्या वाहनावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, ओम शर्मा, यांच्यासह स्थानिक मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पावन जन्म दिवस साजरा करण्यासाठी शहाद्यातील रस्त्यांवर समस्त रामभक्तांची गर्दी एकवटलेली दिसली. शहादा येथे प्रभू श्रीराम यांची काढण्यात आलेली भव्य रॅली लक्ष वेधून घेणारी ठरली. जागोजागी फडकणारे भगवे ध्वज, रामनामाचा गजर करणारे राम भक्त आणि आकर्षक प्रकाश योजना यासह काढण्यात आलेल्या त्या मिरवणुकीतील रामभक्तासमवेत सहभागी होऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सुद्धा आनंद घेतला. जय श्रीराम च्या घोषणा देऊन खासदार डॉक्टर हिना गावित जमलेल्या तरुणांच्या समूहाला प्रेरित करताना दिसल्या.