Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देवनदी दरीत पिकअप व्हॅन कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी

team by team
April 18, 2024
in क्राईम
0
देवनदी दरीत पिकअप व्हॅन कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी

मोलगी | रविंद्र वळवी

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पिंपळखुंटा गमन रस्त्यावरुन जाताना पिकअपवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गमनचा उमरपाडा भागातील देवनदीत पिकअप वाहन कोसळल्याने झालेल्या अपघातात पिकअप मधील दोघे जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कैलास सुरेश पाटील रा. ध्रुवनगर नाशिक हा त्याच्या ताब्यातील एमएच १८ ए ए 47 33 या पिकअप वाहनामध्ये प्रवासी बसून अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा ते गमन रस्त्याने जात होता त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने उमरपाडा गावाजवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटला यात पिकअप वाहन थेट देवनदीत कोसळले या अपघातात राजू ओंकार बारेला वय वर्ष 30 राहणार कर्जांना ता. चोपडा व पोपट दत्तू ससाने वय 40 रा. नाशिक असे दोघे गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर उत्तम वाघ राहणार कुंजर ता. चाळीसगाव, सुनील बड्या पावरा वय 20 राहणार खर्डीखुर्द चा पाटीलपाडा ता.धडगाव व कैलास सुरेश पाटील वय 38 राहणार ध्रुवनगर नाशिक यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या अपघातात वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत ज्ञानेश्वर उत्तम वाघ यांच्या फिर्यादीवरुन पिकअप चालक कैलास पाटील याचे विरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार हे करीत आहेत

बातमी शेअर करा
Previous Post

अमन काॅलनी रहिवासी समस्यांनी त्रस्त, आंदोलनाचा इशारा

Next Post

नंदुरबारात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रघुवंशी समाजाच्या वतीने शोभायात्रा, रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add