नंदुरबार l प्रतिनिधी
पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समिती व संतप्त आदिवासी शेतकऱ्यांनी सुजलोन कंपनीत ठिय्या आंदोलन करीत 22 एप्रिल पर्यंतचा अलटीमेटम दिला आहे.
सुजलान व तीची उप कंपनी सर्जन रियालतीज यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने हस्तांतरित करून बेकायदेशीर जमिनी बळकावल्या आहेत. या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समिती च्या मार्फत आपल्याला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत .
परंतु अनेक वर्षे लोटूनही यावर अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही . आमच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या. अशी मागणी शेतकऱ्यांची आहे .त्या संदर्भात छडवेल येथील सुजलोन च्या कार्यालयात पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी व सुजलोन चे वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात गेल्या महिन्यात तालुका पोलीस स्टेशन नंदुरबार येथे सुजलोन च्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले होते .परंतु 5 एप्रिल रोजी बैठक असतांना सुद्धा संबंधित विभागाचे कोणताच अधिकारी या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित नव्हता. याचा अर्थ सुजलोन कंपनी व कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे व शेतकऱ्यांच्या मागणीकडे टाळाटाळ करत दुर्लक्ष करीत आहे असे निदर्शनास येते.
यामुळे पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सुजलोन कंपनी येथे अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांचा रोष बघत सुजलोन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समिती व शेतकऱ्यांकडून 15 दिवसाचा अवधी मागत 22 एप्रिल रोजी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पदाधिकारी शेतकरी व सुजलोन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात निर्णायक बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यानी ठिय्या आंदोलन मागे घेतले. जर 22 एप्रिल रोजी या संदर्भात योग्य तो निर्णय लागला नाही तर पवन ऊर्जा जमिन हक्क कामगार संघर्ष समिती व शेतकरी सुजलोन कंपनीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे, बाळासाहेब ब्राह्मणे, जितेंद्र तायडे,योगेश बच्छाव,भिला दौलत भील दामु भील ,तानु भील ,संजय भील. बळिराम भील. भिमराव सामुद्रे ,परबत पाडवी ,बापू दगा भील. तानकी बाई ,बायजा बाई भील ,फुलाबाई भील, हिरामण बाबु भील ,गंगाराम राघो भील ,साहेबराव मलया भील ,भिला भाईदास पान पाटील, रोहिदास थोरात, निबा सदा पानपाटील इ शेतकरी कामगार उपस्थित होते व सुझलोन कंपनी चे जनार्दन जगदाळे, तुकाराम जावरे ,उदय बडगुजर यांसह सुझलान ग्लोबल सर्विस चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.