नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात पंधरा दिवसांच्या अंतराने भरधाव गाड्यांच्या अपघातात दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी शाळेत शिकणारी डिंपल पाटील या मुलीच्या धुळे चौफुली येथे अपघात होऊन मृत्यू झाला तर नुकताच विशाल चौधरी या हुंदा फोटोग्राफर तरुणाच्या देखील करण चौफुली येथे ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांनी या घटनांवरून प्रशासनाला धारेवर धरले आहे. प्रशासनाला वारंवार अवगत करून देखील ढीम्म प्रशासन काहीच कारवाई करत नाहीये, प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे नाहक जीव जात आहेत. तरी प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
मागील काही काळात होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता, डॉ. अभिजीत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे. नंदुरबारच्या सुरक्षेसाठी एकमेव राजकीय नेते पुढे आले याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.