Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिशाहीन तरुण पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी श्रीमद् भगवदगीता प्रवचन सोहळ्याचे आयोजन- सतीश दादाजी अमृते

team by team
March 26, 2024
in सामाजिक
0
दिशाहीन तरुण पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी श्रीमद् भगवदगीता प्रवचन सोहळ्याचे आयोजन-  सतीश दादाजी अमृते

नंदुरबार l प्रतिनिधी
आजचा समाज हा दिशाहीन झाला असून तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे. मुलांना सुसंस्कृत करावे त्यांना अध्यात्मिक ठेवावे जेणेकरून समाज हा सुसंस्कृत व आध्यात्मिक बनेल असे उदगार सत्यभामा अमृत पवर्तक समूहाचे पोथी प्रवचक सतीश दादाजी अमृते यांनी त्यांच्या अमृतवाणीतून सांगितले. नंदुरबार येथील विमल हौसिंग सोसायटी येथे श्रीमद् भगवदगीता प्रवचन सोहळा व लोळाचरित्र तथा संस्कार शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला मार्गदर्शन करत असताना सतीश दादाजी अमृते यांनी सांगितले की मुला मुलांना संस्कृत व आध्यात्मिक बनवण्यासाठी अशा सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत असते.

भगवद् गीतेत संपूर्ण विश्वाचे सार कृष्ण भगवानने अर्जुनांला निमित्त करून विश्वाला सांगितले आहे .आपण कर्म करत असताना दोन प्रकारचे कर्म करत असतो. सकाम कर्म व निष्काम कर्म . सकाम कर्म आपणास काही देणार नाही पण निष्काम कर्म आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार .भगवंताने गीताचा माध्यमातून सांगितले आहे की परमेश्वर प्राप्ती शिवाय तुमचा जीवनात उद्धार होणार नाही त्यासाठी या भगवद् गीतेचा जन्म झाला आहे .

मानभाऊ पंथ म्हणजे एकनिष्ठ भक्ती करणारा संप्रदाय आहे .या संप्रदायाच्या माध्यमातून लाखो लोकांना व्यसनमुक्त करण्यात आले आहे .या लाखो लोकांच्या जीवनात आज शांती प्रस्थापित झाली आहे. आपल्याही जीवनात भगवद् गीताच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करावी असा संकल्प आपण करावा. मानभाऊ पंथात संकल्प ला महत्व दिले गेले आहे .

जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू ग्राह धरली जात नाही म्हणून आपण चांगले होण्याचा संकल्प करावा .श्रीमद् भगवद् गीता प्रवचन सोहळा हा 12 दिवस चालतो यात भगवद् गीताचे जीवनमूल्य सांगितले जातात. कर्म कशा प्रकारे करावे स्थित पद्य, संन्यास म्हणजे काय , संयम म्हणजे काय हे शिक्षण व श्लोकच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्या साठी या श्रीमद् भागवत प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे पोथी प्रवचक सतीश दादाजी अमृते यांनी सांगितले. या प्रवचन सोहळ्याला आयोजक मंगला गिरासे ,प्रेमसिंग गिरासे, अपर्णा गिरासे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार लोकसभेसाठी अनुभवी विरुद्ध नवख्या युवा उमेदवारांमध्ये रंगणार सामना

Next Post

नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एकाच वेळी 70 वाळू वाहनांवर कारवाई

Next Post
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एकाच वेळी 70 वाळू वाहनांवर कारवाई

नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एकाच वेळी 70 वाळू वाहनांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add