नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी भाजपातर्फे तिसऱ्यांदा खा.डॉ.हिना गावीत यांना तर काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आली आहे. अनुभवी उमेदवार विरुद्ध नवखा उमेदवार अशा युवकांमध्ये सामना रंगणार आहे.
नंदुरबार लोकसभेसाठी भाजपातर्फे तिसऱ्यांदा खा.डॉ.हिना गावीत यांना उमेदवारी देण्यात आली.खा.डॉ.गावीत या आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची सुपुत्री आहेत.त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी मधून भाजपात प्रवेश करीत भाजपाची उमेदवारी मिळवली होती.खा.डॉ.हिना गावीत यांनी काँग्रेसचे 9 वेळेस खासदार असलेल्या माणिकराव होडल्या गावीत यांचा पराभव केला तर 2019 मध्ये काँग्रसचे आ. ॲड.के.सी.पाडवी यांचा 95 हजारांनी पराभव करीत दुसऱ्यांदा विजयी झाल्या.यावेळी पक्षांतर्गत गटबाजी व शिंदे गटाचा विरोध असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा असतानाच भाजपाने तिसऱ्यांदा खा.डॉ.गावीत यांनी उमेदवारी दिली.
त्यामानाने काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यास उशीरच झाला.अखेर काँग्रेसने आ. ऍड.के.सी पाडवी यांचे चिरंजीव ॲड.गोवाल पाडवी या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी दिली. खा.राहुल गांधी यांची नंदुरबार येथे भारत जोडो न्याय यात्रा आली यात ऍड.गोवल पाडवी नियोजनात आग्रेसर होते. स्टेज वर राहुल गांधी यांच्या पाठीमागे त्यांना बसविण्यात आले होते.त्याचे फलित म्हणून त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली.
काँग्रसचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी जिल्ह्यासाठी नवीन चेहरा आहे.आ. ऍड.के.सी पाडवी यांचा मुलगा याशिवाय त्यांचे विशेष ओळख नाहीय.त्यांच्या उमेदवारी बद्दल जिल्हयात सोशल मीडियातील संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा चेहरा प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न होत आहे.त्यामानाने खा.डॉ.हिना गावीत यांनी महायुतीच्या नेत्यांची विविध तालुक्यात भेटीगाठी घेत आघाडी घेतली आहे.32 वर्षीय ऍड. गोवाल पाडवी व 36 वर्षीय खा.डॉ.हिना गावीत या दोन युवा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. काँग्रस उमेदवारासाठी पक्षाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.त्यातच बड्या नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस कुमकुवत झाला आहे.तर भाजपा उमेदवारापुढे पक्षांतर्गत गटबाजी व शिंदे गटाचा विरोध शमविण्याचे आव्हान आहे.