Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ.हिना गावित यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास मतदारांपुढे मांडणार; नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत निर्धार

team by team
March 24, 2024
in राजकीय
0
खा.डॉ.हिना गावित यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास मतदारांपुढे मांडणार; नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत निर्धार

नंदुरबार l प्रतिनिधी
खा.डॉ.हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत केलेला विकास मतदारांपुढे मांडणार आणि महायुती मधील घटक पक्षांच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना त्यासाठी कार्यरत केले जाईल; असा निर्धार नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नंदुरबार येथील बाबा रिसॉर्ट च्या सभागृहात दि. 22 मार्च 2024 रोजी लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा डॉ हिना गावित यांच्या निवडणूक प्रचार संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीची बैठक झाली.

बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित ,भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, खा डॉ हिनाताई गावित, भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, शिरपूर येथील भाजपाचे आ काशीराम पावरा, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे आ आमश्या पाडवी, भाजपचे नंदुरबार लोकसभा प्रमुख तुषार रंधे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, किरसिंग वसावे, आरपीआय जिल्हाध्यक्ष किरण कुवर, शामअण्णा वाघ, सुभाष पान पाटील, किरण कुवर आदी मान्यवर व महायुतीचे विधानसभा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार काशीराम पावरा आमदार आमशा पाडवी यांच्यासह उपस्थित काही प्रमुखांनी आपापल्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडली आणि गावागावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराला वेग देण्याविषयी मत मांडले. महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान खा. डॉ. हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून किती प्रकारच्या योजना आणि निधी प्राप्त झाले त्यावर आधारित झालेले विकास कार्य लोकांसमोर मांडले जावे आणि विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकनायक सूतगिरणीच्या चेअरमनपदी दीपकभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हरीदास पाटील यांची निवड

Next Post

नंदुरबार लोकसभेसाठी अनुभवी विरुद्ध नवख्या युवा उमेदवारांमध्ये रंगणार सामना

Next Post
नंदुरबार लोकसभेसाठी अनुभवी विरुद्ध नवख्या युवा उमेदवारांमध्ये रंगणार सामना

नंदुरबार लोकसभेसाठी अनुभवी विरुद्ध नवख्या युवा उमेदवारांमध्ये रंगणार सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add